सावंतवाडी (प्रतिनिधी)
अर्चना घारे परब , जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतली पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. माजी आमदार राजन तेली यांच्या उबाठा शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.





