मळेवाड येथील चिरेखाणीवर दफन केलेला मृतदेह बाहेर काढला,शवविच्छेदन करिता कोल्हापूर सी पी आर मध्ये नेणार अपघातातील डंपर एका उद्योजकाच्या नावावर असल्याची चर्चा
मळेवाड येथील चिरेखाणीवर दफन केलेला मृतदेह बाहेर काढला,शवविच्छेदन करिता कोल्हापूर सी पी आर मध्ये नेणार अपघातातील डंपर एका उद्योजकाच्या नावावर असल्याची चर्चा
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील चिरेखाणीवर 5 ऑगस्ट रोजी जांभा दगडाने भरलेला डंपर पलटी होताना त्यातील दगड 3 वर्षीय मुलीवर पडून मुलाचा मृत्यू झाला होता.यानंतर त्या मुलीलाजवळीलच साठी येथील महाराणावर जमिनीत दफन करण्यात आलेयाची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच तात्काळ सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दखल घेत आज दफन केलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आला आहे.या दफन प्रकरणी मुलीचे आई-वडील त्याचप्रमाणे डंपर चालक मालक जेसीबी मालक यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,नायब तहसीलदार मनोज मुसळे,वैद्यकीय अधिकारी,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,त्याचबरोबर दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी आहेत.