कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्य कौतुकास्पद – नंदकुमार घाटे

102

 

कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्य कौतुकास्पद – नंदकुमार घाटे

देवगड (प्रतिनिधी)१९ ऑगस्ट २०२४

कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत केंद्र सरकार योजनेअंतर्गत सीएससी सेंटर उदघाटन सोहळा सोमवार दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी स.१०.३० वा.उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या शुभहस्ते फीत कापून,श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सोसायटी चेअरमन निलेश पेडणेकर,उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, कोषाध्यक्ष अभय पेडणेकर,सचिव शरद वाळके उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी घाटे म्हणाले, कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असून सीएससी सेंटरमुळे शेतकरी बागायतदार ,ग्रामस्थ याना चांगली सेवा मिळणार आहे. त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोहळ्यास व्हॉइस चेअरमन भाऊ मुंबरकर, संचालक, नागेश आचरेकर,संदीप जोईल,बबन चव्हाण,सत्यवान धुरी,शंकर नाणेरकर,अजय नाणेरकर,सुहास नाणेरकर, माजी सरपंच चंद्रकांत घाडी, तुकाराम,तेली,देवस्थान ट्रस्ट सदस्य संजय आचरेकर,आण्णा वाळके,मंगेश पेडणेकर, रावजी वाळके, तुकाराम तेली,वैष्णवी धुवाळी,मनाली मुंबरकर,रेश्मा गावकर,सोनल घाडी,उपस्थित होते.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सोसायटी सदस्या महिला पदाधिकारी ,कर्मचारी यांनी उद्योजक नंदकुमार घाटे यांना औक्षण करून राखी बांधली व रक्षाबंधन सण साजरा केला .