वार्ड नंबर ११ मध्ये आपण लक्ष घालू आमदार राणेंनी दिले आश्वासन
देवगड (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४
वार्ड नंबर ११ मधील साटमवाडी परिसरातील विकास कामे तातडीने करावीत अशी मागणी तेथील भाजपा पदाधिकारी दिलेश साटम यांनी आ. नितेश राणे यांच्याकडे केली आहे
दीलेश साटम यांनी आ. नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की मारुती मंदीर ते पालकर यांचे घरा पर्यंतचा रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरण,सदर रस्त्यासाठी आवश्यतेप्रमाणे संरक्षक भित,श्री. सोनटक्के सर घर ते साटम रेस्टॉरंट पर्यंतचा रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरण,देवगड स्मशानभूमी ते देवगड बिच रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणे,देवगड बीच येथे मुलाना खेळणी, युवा वर्गासाठी जिम उपकरण असलेलं माना नानी पार्क,देवगड बीच रस्ता पुढे मुस्लिम कब्रस्तान आणि पवनचक्की पाउलवाट पर्यंत जोडून डांबरीकरण करणे,अशोक साटम यांच्या घरासमोरील उपलब्ध बोरिंग ला पंप बसून पाइप कनेटिव्हिटी करून घरोघरी पाणी पुरवठा सोय करणे,पवनचक्की परिसरातील पवार घर ते राजम घर आणि प्रभु घर ते सोनू चौगुले घर रस्ता डांबरीकरण,श्री कृष्णा मोहिते आणि श्री. विजय जोशी यांच्या घरासमोरील रस्त्यालगतचे वहाळ उघडे गटार, सापळे घरापर्यंत बंदिस्त बांधकाम करणे, संभाव्य अपघात टाळता येतिल. सदर काम मंजूर असुनही रखडले आहे.
याबाबत तातडीने वैयक्तिक लक्ष घालत असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आहे





