२ कोटी ४० लाख डिझेल परताव्याची रक्कम लवकर मिळावी ; देवगड फिशरमन सस्थेचे आमदार नितेश राणे यांना निवेदन

60

२ कोटी ४० लाख डिझेल परताव्याची रक्कम लवकर मिळावी ; देवगड फिशरमन सस्थेचे आमदार नितेश राणे यांना निवेदन

देवगड (प्रतिनिधी) २६ जुलै २०२४

 

शासन निर्णयानुसार आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते
कार्यपद्धती लागू करणेसाठी वित्तविभाग विचाराधीन आहे. त्यामुळे मच्छिमारांना मिळणारा मंजुर डिझेल परतावा रु. दोन कोटी चाळीस लाख सहासष्ठ हजार सहाशे एकोणनव्वद एवढी डिझेल परताव्याची रक्कम मच्छीमारांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. ही मंजूर डिझेल परताव्याची रक्कम लवकर जमा व्हावी यासाठी आमदार नितेश राणे यांना देवगड फिशरमन सोसायटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
.VPDA कार्यपद्धतीमुळे शासकीय देय्यके निर्दोष व जलद पद्धतीने वितरण होतील याची मच्छिमारांना खात्री आहे. मच्छिमारी हंगाम माहे ऑगस्ट पासून सुरु होत असुन त्यासाठी येणाऱ्या डिझेल परतावा रक्कमेचा उपयोग होणार होता. परंतु शासन निर्णयानुसार आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते VPDA कार्यपद्धती लागु होईपर्यंत मच्छिमारांना मिळणा-या डिझेल परताव्याला विलंब होणार आहे. त्यामुळे मच्छिमारांची आर्थिक
कोंडी होण्याची शक्यता आहे. तरी मंजुर डिझेल परतावा रक्कम जुन्या पद्धतीप्रमाणे मा.सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण यांचे कार्यालयामार्फत वितरीत करणेत यावा. डिझेल परताव्याची रक्कम हंगाम सुरु होण्यापुर्वी, ऑगस्ट महिन्यापुर्वी मच्छिमारांच्या खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. अशी विनंती मच्छीमार बांधवांनी देवगड फिशरमन सोसायटीच्या वतीने निवेदनद्वारे केली आहे.