कलमठ बाजारपेठ येथील रहिवासी अरविंद उर्फ तात्या पांडुरंग गावडे (७४) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. ते स्मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचे होतं.त्यांच्यावर शनिवार २७जुलैला अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विठ्ठल उर्फ पप्पू व सागर गावडे यांचे वडील होत.