दोडामार्ग : मोर्ले गावात पुन्हा एकादा हत्तीचा वावर वाढला असुन केळी, नारळ, सुपारी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये यांच्या केळीबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असून हत्तीच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

दिवसरात्र मेहनत करुन बागायतीची जर वन्यप्राण्यांकडून क्षणार्धात नासधूस होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.





