कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

5

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

कणकवली दि ४ जुलै (तुळशीदास कुडतरकर)

कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये दिनांक ३ जुलै २०२४ रोजी *योजनांचा जागर* हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष श्री वगरे व्ही. व्ही. (मुख्याध्यापक कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ) प्रमुख उपस्थितामध्ये श्री के आर दळवी (चेअरमन स्कूल कमिटी) श्री प्रकाश दळवी- कळसुली शिक्षण संघ मुंबई सल्लागार, श्री नामदेव घाडीगावकर – स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन,श्री – कळसुली शिक्षण संघ श्री रजनीकांत सावंत स्कूल कमिटी सदस्य ज्येष्ठ शिक्षक श्री सावळ एस के, शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री जयवंत घाडीगावकर, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

याप्रसंगी शिक्षक पालक संघाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या कळसुली दशक्रोशीतून पालक संघ निवडण्यात आला.

प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री व्ही.व्ही.वगरे यांनी शिक्षक-पालक संघाची उद्दिष्टे व महत्व विशद केले त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे कार्य आणि शालेय उपक्रमामध्ये सहभाग याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रशालेमध्ये योजनांचा जागर या कार्यक्रमांतर्गत शाळेत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती, इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, धार्मिक अल्पसंख्यांक मुला-मुलींसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती,अल्पसंख्यांक मुलीसाठी हजरत बेगम महल शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एन. एम. एम. एस.व सारथी योजना यासारख्या विविध शिष्यवृत्ती योजना प्रशालेमध्ये असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी या योजनांची सविस्तर माहिती यावेळी समस्त पालक वर्गांना देण्यात आली त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व शिष्यवृत्तीची रक्कम याबाबत पालकांना अवगत करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये शिक्षक पालक संघ कार्यकारणी निवडण्यात आली.

शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.वगरे व्ही. व्ही. तर उपाध्यक्ष श्री बाबाजी वासुदेव मुरकर तर सचिव म्हणून शिक्षकांमधून सौ सुतार यु. व्ही. सहसचिव म्हणून सौ स्मिता विनायक भोसले त्याचप्रमाणे श्री यशवंत रघुनाथ सावंत, श्रीमती रुबीना शकील मालीम श्री.राजाराम बाळा चव्हाण सौ.नीता शिवाजी गुरव श्री रामचंद्र अर्जुन सावंत सौ रश्मी रामचंद्र देसाई इत्यादींची नेमणूक करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्कूल कमिटी चेअरमन श्री के.आर. दळवी यांनी समस्त पालक वर्गाला प्रशालेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देत मागील कार्यकारिणीचे चांगल्या कार्यासाठी आणि सहकार्यासाठी आभार व्यक्त केले.

प्रमुख उपस्थितांमध्ये मार्गदर्शन करताना श्री प्रकाश दळवी यांनी पालकांना विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण द्यावे आणि शाळेला शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले.

या सभेचे सूत्रसंचालन माजी सचिव श्री. बी आर पालव आणि सांगता सचिव सौ. सुतार यु. व्ही. यांनी आभार व्यक्त करून केली.