भाजपा कार्यकर्ते रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आशिये जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

19

भाजपा कार्यकर्ते रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आशिये जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली( प्रतिनिधी )

आशिये गावातील भाजप कार्यकर्ते श्री.रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशिये शाळेतील मुलांना वह्या,पेन,पेन्सिल,खोडरबर इ.शैक्षणिक साहित्य रोहित ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.समीर ठाकूर यांच्या माध्यमातून माजी सरपंच श्री.शंकर गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.तसेच कलमठ बाजारपेठ शाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच श्री.संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत जिलेबी वाटप करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा,आशियेच्या वतीने श्री.समीर ठाकूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचही अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आशिये गावतील सामाजिक कार्यकर्ते श्री.समीर ठाकूर,श्री.अमित ठाकूर,मुख्याध्यापिका सौ.सावंत मॅडम,सौ.मोरे मॅडम.श्री.कदम सर,रोहन ठाकूर,लखन इंगळे ,प्रथमेश इंगळे,विशाल इंगळे, मांतेश देवरमानी,राठोड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाचे जि.प.शाळा आशिये शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.