कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीवर मनोज पाताडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मनोज पाताडे यांचे अभिनंदन केले मनोज पाताडे यांनी गेल्या पाच वर्षात आमदार वैभव नाईक माजी जि प सदस्य अमरसेंन सावंत यांच्या माध्यमातून विकास कामांचा पाठपुरावा करत मोठया प्रमाणात विकास कामे केली.
या कोट्यावधी च्या झालेल्या विकास कामांमुळेच जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करून दिले तोच पुन्हा एकदा विश्वास दाखवत मला बिनविरोध उपसरपंच पदी विराजमान करण्यात आले जनतेने दाखवलेला विश्वास आपण कधीही विसरणार नाही असे गौरउद्गार मनोज पाताडे यांनी काढले यावेळी सॊ अनुजा सावंत, दीपक चोरगे, मंदार कोठावळे, राजू पवार, उदय धावले, अंकुश पुळासकर, गाव प्रमुख दाजी पवार, मोहन गावडे नामदेव परब, अनंत सावंत, प्रशांत जाधव, सोनाली सावंत,जानवी पवार शुभम शेडगे, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.





