हळवल येथील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळामध्ये सुमारे 100 मुलांना वह्या वाटप ;  लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलने उपक्रमातुन जपली सामाजिक बांधिलकी **

21

हळवल येथील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळामध्ये सुमारे 100 मुलांना वह्या वाटप ;  लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलने उपक्रमातुन जपली सामाजिक बांधिलकी **

कणकवली दि १९ जून(प्रतिनिधी :

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून हळवल गावातील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. हळवल येथील जिल्हापरिषदेच्या तिन्ही शाळामध्ये सुमारे 100 मुलांना मंडळाच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात .ह्या वर्षी शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत, दहावी बारावी विध्यार्थी सत्कार तसेच बचत गटाना वह्या वाटत असे उपक्रम घेण्यात आले आहेत.

शाळांमध्ये वह्या वाटप करताना सामाजिक बांधिलकी जपत मागील 20 वर्षे हे मंडळ सातत्याने कार्यरत आहे अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लवू परब, माजी उपसरपंच अरुण राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, सचिन ठाकूर, शाळा हळवल नं 1 च्या मुख्याध्यपिका श्वेता मेस्त्री, शिवराम सुतार, स्वप्नील सावंत सौ सरकारे, सौ परब, श्री गोसावी, श्री जाधव, सौ. राणे, मंडळाचे उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब, खजिनदार गणेश गावडे, विकास गावडे उद्योजक दिपक राऊळ, शिवा राणे, माजी उपसरपंच लक्ष्मण गावडे, सागर राणे, संदीप राणे, प्रथमेश राणे, ओंकार मडवळ अशोक चव्हाण आदीसह ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.