युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. १ मार्फत शालेय साहित्य वाटप
कणकवली ( प्रतिनिधी)
जि. प. पूर्ण प्राथ. शाळा लोरे नं. १ या शाळेत युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं. १ मार्फत शालेय साहित्य वाटप (कपाट) देण्यात आले. या प्रसंगी युवा परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर (चंदू) रावराणे, उपाध्यक्ष श्री. निलेश रावराणे, सचिव श्री. अमित रावराणे, खजिनदार श्री. विशाल राणे, सदस्य श्री. रमेश राणे, योगेश रावराणे, प्रीतम राणे, आदि उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश गोसावी , पदवीधर शिक्षक श्री. करावडे उपशिक्षक श्री. यादव आणि गवाणकर मॅडम उपस्थित होते. या प्रसंगी शालेय भौतिक सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी या विषयावरही चर्चा करण्यात आली. श्री. चंदू रावराणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शालेय भौतिक सुविधा बाबत आणि शालेय प्रगती मध्ये आपणास कोणतीही अडचण असल्यास युवा परिवर्तन प्रतिष्ठान आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन दिले.
श्री. सतीश गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले व युवा परिवर्तन प्रतिष्ठानला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.