देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
देवगड (प्रतिनिधी) ११ जून २०२४
देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी १२ जून रोजी जामसंडे हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ९:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे .तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे .असे आवाहन देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.