देवगड (प्रतिनिधी)दि १० जून २०२४
आनंद देवगडकर यांच्या जागृकतेमुळे
दहीबाव दाभोळे मार्गावरील त्या रस्त्याची तात्काळ मलमपट्टी
तालुक्यातील दाभोळे गणेश नगर येथील किशोर धुरी यांचे घरा समोर दाभोळे ते दहिबाब या मुख्य मार्गावरील डांबरीरस्त्याला होल पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते आनंद देवगडकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब तसेच आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार राजदूत संघटनेचे पोलीस संरक्षण अधिकारी विजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विजय कदम प्रत्यक्ष माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड अधिकारी यांचेशी संपर्क साधला व बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व त्याठिकाणी तात्काळ दुरुस्ती करून सदर भोक दगड टाकून बुजविले त्यामुळे संभाव्य होणारी मोठी दूर्घटना टळली असल्याने तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त झाले . आनंद देवगडकर व विजय कदम तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड यांना धन्यवाद दिले आहेत.





