7

जागतिक पर्यावरण दिना निमित्त तळेरे नं.१ शाळा परिसरात औषधी व मसाला वनस्पतीचे वृक्षारोपण

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)५ जून २०२४

निसर्ग मित्र परिवार तळेरे , पत्रकार मित्र परिवार तळेरे व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.1च्या परिसरात औषधी वनस्पती व मसाल्याचे पदार्थाच्या वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या शाळेच्या विद्यार्थ्यिंनी कु.प्रेक्षा दिपक नांदलस्कर व कु.रिध्दी राजेश जाधव यांच्या शुभहस्ते सदरचा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.यामध्ये काही औषधी वनस्पती तर तमालपत्र,लवंग, दालचिनी जायफळ,ओवा,कडीपत्ता या मसाल्याच्या वनस्पती बरोबरच जांभुळ,शेवगा या वनस्पतीची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी स्व.सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे-अध्यक्ष सुरेश तळेकर,निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक,तळेरे गावचे उपसरपंच शैलैश सुर्वे,माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड, सचिव राजेश जाधव,माजी सरपंच शशांक तळेकर,तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर,प्रज्ञांगणचे संस्थापक सतिश मदभावे,
मयुर चव्हाण यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.