वादळी वाऱ्यामुळे कळसुलीत विद्युत खांब जमीनदोस्त ; विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित
कणकवली दि.१६ मे (प्रतिनिधी)
गडगडासह आणि कडकडासह मेघ गर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळीवाऱ्यने कणकवली तालुक्यातील हळवल,शिरवल कळसुली, येथे अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद तर काही ठिकाणी शेतघर , शेतीपंप केबिनचे पत्रे वाऱ्याने उडून गेले.तर कळसुली उल्हास नगर बौद्धवाडी येथे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने आणि
विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.आणि मोठे नुकसान झाले.याचा फटका ग्रामस्थांना बसला.
यामुळे कळसुली परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. मात्र वादळी वाऱ्याचा फटका बसून वीज पोल तुटुन पडल्याने कळसुली गावातील वीज प्रवाह खंडित झाला.
मागील 2 दोन वर्षांपूर्वी उल्हासनगर बौद्धवाडी तेथे इलेव्हन केव्हीची लाईन जीर्ण झालेली असून ,तसेच विद्युत खांबही धोकादायक बनले आहेत.याबाबत कणकवली येथील वीजवितरण कार्यालयाला कळसुली
बौद्धवाडी ग्रामस्थांनी भेट देऊन त्यांना वेळोवेळी निवेदने दिली. मात्र सुशेगाद असलेल्या कार्यकारी अभियंता आणि वीजवितरण कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने आज हि परीस्थिती उद्भवल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली .
आता तरी लोकांच्या जीवाशी न खेळता महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता या समस्याकडे तात्काळ लक्ष देऊन धोकादायक ठरलेले विद्युत पोल आणि इलेव्हन केवी लाईन बदलणार आहेत का..? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.





