रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा जामसंडे श्री दिर्बादेवी मंदिरात श्रीफळ वाढून केला शुभारंभ
देवगड (प्रतिनिधी)ता. २३ एप्रिल २०२४
देवगड जामसंडे शहरातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. देवगड जामसंडे शहरात राणेंना मताधिक्यही काळ्या दगडावरची रेघ असून विनायक राऊत पुन्हा खासदार होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार अजित गोगटे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय घटक पक्ष महायुती उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी श्री दिर्बादेवी रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळावे.यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर मंदिर परिसर विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा भाजप निमंत्रित सदस्य बाळ खडपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, सरचिटणीस शरद ठुकरुल महिला अध्यक्ष उष:कला केळुसकर, तन्वी शिंदे, शहर अध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर, माजी जि प सदस्या मनस्वी घारे, गणपत गावकर, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





