एनएमएमएएस परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील कुमारी उदी उमेश कुळकर्णीचे यश

29

एनएमएमएएस परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील कुमारी उदी उमेश कुळकर्णीचे यश

देवगड ( प्रतिनिधी ) दि. १९ एप्रिल २०२४

डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एन एम एम एएस (National Means Cum Merit Scholarship Scheme ) परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील कुमारी उदी उमेश कुळकर्णी हिला शिषवृत्ती प्राप्त झाली आहे .
सदर परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु.उदी उमेश कुळकर्णी हिची जिल्हास्तरीय निवड यादीत सर्वसाधारण ( ओपन ) मध्ये एन एम एम एएस शिषवृतीसाठी निवड झाली आहे.शिषवृती प्राप्त विद्यार्थ्याला इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरवर्षी १२००० /. रुपये प्राप्त होते असे या शिषवृत्तीचे स्वरूप आहे.
कु.उदी कुळकर्णी हिने मिळविलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अँड श्री. अजितराव गोगटे , कार्यवाह श्री. प्रविण जोग ,शाला समिती अध्यक्ष श्री. प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक श्री. संजय गोगटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.