
झुडपात आढळला 53 वर्षीय इसमाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह ; ओरोस रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) दि ११ एप्रिल २०२४
सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील रेल्वे स्टेशनच्या परिसरातील झुडपात एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला .तो मृतदेह गोवा येथून बेपत्ता झालेले संजय शंकर कोदरे (वय ५३) यांचा असल्याचे समजते. याबाबतची खबर अश्विन अवसरे यांनी पोलीसांना दिली आहे.
अवसरे हे रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या झाडीच्या आडोशाला नैसर्गिक विधी करण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी उग्र दुर्गंधी येत लागली. त्यांनी त्याची पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संजय कोदरे यांचा मृतदेह फुगलेला व अर्धवट कुजलेला अवस्थेत दिसला. त्यानंतर आश्विन अवसरे रेल्वे स्टेशन येथे आले असता त्यांना गोवा पोलीस दिसले. त्यांनी नापत्ताचा फोटो दाखवुन पडताळणी केली.अवसरे यांनी फोटो दाखवून गोवा येथून नापत्ता असलेल्या व्यक्ती मधीलच ही व्यक्ती असल्याचे गोवा पोलीस यांना सांगीतले. त्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या मयत व्यक्तीच्या मुलाने मृतदेह पाहुन ओळख पटवली असून तो मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालय
सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.




