Home अपघात गोव्यातून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक कलंडून अपघात ;  बांदा -दाणोली मार्गावरील घटना

गोव्यातून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक कलंडून अपघात ;  बांदा -दाणोली मार्गावरील घटना

134

 

गोव्यातून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक कलंडून अपघात ;  बांदा -दाणोली मार्गावरील घटना

 

बांदा- प्रतिनिधी

बांदा -दाणोली जिल्हा रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात चालक व चालक बालंबाल  बचावला. मात्र ट्रकचे किरकोळ नुकसान झाले.हा अपघात रविवार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. बांदा-दाणोली रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने अशा प्रकारचे अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

चालक बांद्याहुन  दाणोली-आंबोली च्या दिशेने गोव्यातून पुणे तेथे मशिनरी घेऊन जात होता. वाफोली येथे उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्यालगतच्या घळणीत कलंडून अपघातग्रस्त झाला.  या सोमवारी सायंकाळीपर्यंत अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही.

बांदा- दाणोली जिल्हामार्गाची राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत सदस्य संदीप गावडे यांच्या पर्यंत्नाने  रस्ता खड्डेमुक्त झाला. पणं काही ठीकाणी अरुंद रस्ता असल्याने वाहन चालकाकडून वेगमर्यादा न पाळल्याने असे अपघात निमंत्रण देत आहे. वाफोली डोंगरीकर हाँटेलजवळ तिराळी पाटबंधारे  बांदा उपकालव्याचे पाणी या मार्गावरुन वाहत आहे. यामुळे या ठिकाणचे डांबरीकरण पाण्यात गेले आहे. आंबोली आणि गोवा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहनचालक याचा मार्गांचा अवलंब करत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून वेग मर्यादा व चिन्ह दर्शक फलक लावणे गरजेचे आहे.