फोंडाघाट विश्रामगृहाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते लोकार्पण आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून साकारल्या स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि १३ मार्च २०२४
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सर्वात पहिले विश्रामगृह म्हणून ओळख असणाऱ्या फोंडाघाट विश्रामगृहाच्या नूतनीकरणानंतरचा लोकार्पण सोहळा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते व आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, उपअभियंता के. के. प्रभू, राहुल पवार, नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, राजन चिके, बबन हळदिवे, उपसरपंच तन्वी मोदी, दर्शना पेडणेकर, विश्वनाथ जाधव, माजी सभापती सुजाता हळदिवे, सुनील लाड, भाई भालेकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कल्पनेतून भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे फोंडाघाट विश्रामगृह याठिकाणी राहिल्याच्या स्मृतिप्रित्यर्थ विश्रामगृहाच्या हॉलमध्ये त्यांची प्रतिमा त्यांच्याच कवितांसह लावण्यात आली आहे.
सर्वगोड यांच्या पुढाकाराने फोंडाघाट विश्रामगृहाची मुख्य इमारत तसेच शिपाई राहत असलेल्या खोलीचेही नूतनीकरण सुमारे ३५ लाख रुपये खर्चुन करण्यात आले आहे.





