देवगड ग्रामीण रूग्णालयातील डायलेसीस सेंटर चालू करा अन्यथा आंदोलन
देवगड (प्रतिनिधी) दि १२ मार्च २०२४
देवगड ग्रामीण रुग्णालयातील बंद असलेले डायलेसिस सेंटर तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेना उभाता गट युवा सेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या देवगड ग्रामीण रूग्णालयामधील डायलेसीस सेंटर हे गेले कित्येक दिवस बंद असून सदर प्रकार गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे देवगड मधील डायलेसीसच्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटला जावे लागते. त्यामुळे डायलेसीसच्या रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डायलेसीसची मशीन येत्या २ दिवसात चालू झाली नाही तर आम्ही युवासेनेच्या वतीने ग्रामीण रूग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना (उबाठा गट)युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक संजय विटकर यांना दिला आहे.





