हडपिड श्री स्वामी समर्थ मठातील मुख्यमूर्तीचे दर्शन राहणार एक आठवडाभर बंद ; मूर्तीवरिल वज्रलेपाच्या कामाचा उद्यापासून होणार प्रारंभ.

273

हडपिड श्री स्वामी समर्थ मठातील मुख्यमूर्तीचे दर्शन राहणार एक आठवडाभर बंद ; मूर्तीवरिल वज्रलेपाच्या कामाचा उद्यापासून होणार प्रारंभ.

मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांची माहिती

देवगड ता. १२ मार्च २०२४

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित या संस्थेच्या देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठामधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन बुधवार १३ मार्च २०२४ पासून पुढे आठवडाभर दर्शन बंद राहणार असल्याची माहिती संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी दिली आहे.
हडपीड येथील श्री स्वामी समर्थांच्या मठातील गाभाऱ्यातील मोठ्या मुर्तीवर वज्रलेप करण्यात येणार आहे. यासाठी गाभार्‍यातील श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचे दर्शन आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे.मठात येणाऱ्या स्वामी भक्तांची भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वामींची छोटी मुर्ती गाभार्‍याच्या बाहेर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वज्रलेपाच्या कार्यक्रमासाठी साधारण १ आठवड्याचा अवधी लागणार आहे. वज्रलेपाच्या कामामुळे स्वामींच्या मुख्य मुर्तीचे दर्शन भाविकांना होणार नाही.भाविकांच्या होणाऱ्या या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. वज्रलेपाचे काम पुर्ण झाल्यावर भाविकांना कळविण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.