राज्य उत्पादन शुल्काची कारवाई दारू सह वाहन मिळून चार लाखाचा मुद्देमाल जप्त

108

राज्य उत्पादन शुल्काची कारवाई
दारू सह वाहन मिळून चार लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) दि ११ मार्च २०२४

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जुना पत्रादेवीबांदा रोडवर पोस्ट ऑफिस जवळ करण्यात आली दारू वाहतूक केल्याप्रकरणी महेश कृष्णा दाभोलकर राहणार सावंतवाडी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्याकडून दोन लाख 53 हजार दारूसह दीड लाखाची गाडी जप्त करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाकारली या पथकाने जुनापत्रादेवी बांदा रोड बांदा पोस्ट ऑफिस जवळ सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो चार चाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात ओवा बनावटीच्या मध्याचे विविध ब्रांचे 44 बॉक्स अवैध साठा मिळवून आला या प्रकरणी महेश कृष्णा दाभोलकर याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले या कारवाईत दोन लाख 53 हजाराची दारू व एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची गाडी असा एकूण मिळून चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक मनोज शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील प्रदीप रासकर गोपाळ राणे दीपक वायदंडे प्रसाद माळी रणजीत शिंदे यांनी केली याप्रकरणी पुढील तपास प्रदीप रासकर करत आहेत.