विस्तारित वर्ग खोल्यांचा भूमिपूजन समारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बांदा काॅलेजमध्ये मंगळवारी
बांदा (प्रतिनिधी)दिनांक १० मार्च २०२४
येथील गोगटे — वाळके कॉलेज, बांदा यांच्या भौतिक सुविधातंर्गत विस्तारित वर्ग खोल्यांचा भूमिपूजन समारंभ मंगळवार दि. १२ मार्च रोजी दुपारी ठीक दोन वाजता खासदार संजय राऊत यांच्या स्थानिक विकास क्षेत्र निधीतून आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विस्तारित वर्ग खोल्यांच्या भूमिपूजनाचा समारंभ खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते काॅलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे चेअरमन श्री. डी. बी. वारंग हे उपस्थित राहणार आहेत. तरी या भूमिपूजन समारंभास महाविद्यालयाचे हितचिंतक, आजी- माजी विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील व बांदा ग्रामस्थ व परिसरातील पालकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे





