कुसबे येथील बैलगाडा स्पर्धेचे आंब्रड शिवसेना विभागाकडून उत्कृष्ट नियोजन – आमदार वैभव नाईक
बैलगाडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शेतकरी पशुधन वाढवित आहेत हि निश्चितच कौतुकास्पद बाब आहे .
कुसबे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला निनाई प्रसन्न
कणकवली दि.१०(तुळशीदास कुडतरकर)
कुडाळ तालुक्यातील कुसबे सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धचे देखणे आयोजन आऊ उत्कृष्ट नियोजन आंब्रड शिवसेना विभागाने केले आहे.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेत स्पर्धा यशस्वी केली आहे ,सर्वांचे मनापासून कौतुक करतो.असे गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले.
ते कुसबे मधलीवाडी बोरीचा माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात शनिवारी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख संजय पडते,माजी जिल्हा बँकअध्यक्ष अध्यक्षसतिशसावंत ,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट , युवासेना तालुकाप्रमुख योगेश धूरी, राजू गवंडी, सचिन काळप ,दीपक आंगणे विभाग प्रमुख पावशी, नितीन सावंत , कुसबे सरपंच समीक्षा जाधव,, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धूरी, तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख विकास राऊळ, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत,सामाजिक कार्यकर्ते आबा मुंज,, माजी जि.प.सदस्या सौ. कल्पिता मुंज,कुसबे शाखाप्रमुख राजेंद्र घाडीगांवकर, कुसबे युवा सेना शाखाप्रमुख नितीन महाडेश्वर, वर्दे सरपंच महादेव पालव,कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, स्वप्नील शिंदे, नागेश ओरसकर,आंब्रड, विभाग प्रमुख विकास राऊळ, आंब्रड ग्रामपंचायत सदस्य गौरी दळवी, सेजल परब ,कुसबे ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत ,विजय महाडेश्वर ,सविता सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आम.वैभव नाईक म्हणाले की,खरतर प्रत्येकाकडे पशुधन कमी होत चालले आहे. त्यामुळे अशा स्पर्धेच्या माध्यमातून पशुधन वाढले पाहिजे. अनेक शेतकरी अशा स्पर्धेतून पशुधन वाढवित आहेत.निश्चितच ही कौतुकास्पद बाब आहे .
पशुधन वाढविण्याची ,वाचविण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.जमेल त्या पद्धतीने आपण घरी, शेतात पशुधन ठेवले पाहिजे. आणि शासनाच्या अनेक योजनांचा फायदा घेतला पाहिजे. असे आम.नाईक यांनी सांगितले.
आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या स्पर्धांना प्रोत्साहन दिले पाहिजे.यासाठी आपण तीन ते चार तास थांबलो.असे आम.नाईक म्हणाले.
महाभारतामध्ये,रामायण मध्ये ज्या राजाकडे पशुधन असायचे तो राजा समृद्ध होता. या राजांचा आपण आदर्श घेऊन पशुधनाच्या बाबतीत समृद्ध झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले
यावेळी राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम विजेता निनाई प्रसन्न संघ ठरला. या संघाला रोख १५००० हजार रुपये आणि ढाल, द्वितीय विजेता संदीप अंकुश दळवी रोख १३०००रुपये आणि ढाल,तृतीय विजेता विरोभामाबाई प्रसन्न, रोख ११००० रुपये आणि ढाल,चतुर्थ अमोल ठाकूर या विजेत्या बैलगाडा स्पर्धकांना रोख १०,००० रुपये आणि ढाल बक्षीस देऊन आमदार वैभव नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेत
प्रथम विजेता चंद्रकांत नारायण वाटवे,पावशी ,द्वितीय राजू बागवे कुंदे, तृतीय रामेश्वर प्रसन्न, तर
जिल्हास्तरीय प्रथम,प्रथमेश रामचंद्र होडावडेकर द्वितीय,गुलाब इतियादम निशाबदार तृतीय,मिलिंद केळकर चतुर्थ चंद्रकांत वाटवे ,उत्तेजनार्थ गुरुप्रसाद वसंत होडावडेकर हे विजेते ठरले.या विजेत्यांना रोख रक्कम आणि ढाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी राज्य भरातुन बैलगाडी चालक -मालकांनी उपस्थित राहत स्पर्धेत सहभाग घेतला.एकुण 50 बैलगाडी संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.जिल्हा भरातून हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी या बैलगाडी स्पर्धेचा थरार अनुभवला.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
स्पर्धेचे समालोचन विलास गोलतकर आणि काका साटेलकर यांनी केले.तर पंच म्हणून निळकंठ मेस्त्री आणि सुजित पाटकर यांनी काम पाहिले.सुत्रसंचालन आणि आभार आबा मुंज यांनी मानले.






