पडेल येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या पाईपलाईन खोदायचे काम चालू असताना संकेश्वर मंदिराजवळ देवीची मूर्ती
देवगड (प्रतिनिधी)दि ७ मार्च २०२४
पडेल येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या पाईपलाईन खोदायचे काम चालू असताना संकेश्वर मंदिराजवळ देवीची मूर्ती सापडली आहे पडेल येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम चालू आहे या नळ पण योजनेचे काम चालू असते वेळी पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्यादरम्याने सापडली आहे ही देवीची मूर्ती सापडतात शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थ देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मालक बोडस कुटुंबीयांनी दिली आहे शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.





