बोर्डवे – पेंढरीवाडी येथे ८ मार्च सार्वजनिक महाशिवरात्री उत्सव

57

बोर्डवे – पेंढरीवाडी येथे ८ मार्च सार्वजनिक महाशिवरात्री उत्सव

कणकवली (प्रतिनिधी)दि ७ मार्च २०२४

बोर्डवे पेंढरीवाडी येथे ८ मार्च रोजी सार्वजनिक महाशिवरात्री उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यानिमित्त स. ८.३० वा. स्थापना, पूजा, आरती व प्रसाद, सकाळी १० वा. स्थानिक भजने, दुपारी १ ते ४ वा. ओटी भरणे, सायं. ४ ते ६ वा. पंचरत्न दिंडी भजन मंडळ बोर्डवे, सायं. ६ ते ७ वा. स्थानिक इ दिंडी, सायं. ७ ते ९.३० वा. हरिपाठ, रात्री १० वा. बुवा व्यंकटेश नर व बुवा हेमत नारायण तेली यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.

९ मार्चला सकाळी ९ वा. एकादशणी, सकाळी ११ वा. विसर्जन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.