आमदार नितेश राणे त्यांच्या
माध्यमातून विजय कडू यांच्या पायावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात ४ लाखाची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
कडू कुटुंबियांनी मानले , आमदार नितेश राणे व देवगड शहर अध्यक्षा सौ तन्वी शिंदे यांचे विशेष आभार
देवगड (प्रतिनिधी)दि ३ मार्च २०२४
देवगड तालुक्यातील जामसंडे येथील रुग्ण विजय कडू हे पायाने पीड़ित होते. त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रियेसाठी सुमारे खर्च ४ लाख इतके होता. मात्र रुग्ण विजय कडू यांची आर्थिक परिस्थिती हलाखीच्या असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी देवगड भाजपाच्या देवगड महिला शहर अध्यक्षा सौ. तन्वी शिंदे यांच्याशी संपर्क केला.
त्यानंतर नितेश राणे यांचे जवळचे सहकारी मुंबईतील सर्व रूग्णालयाच्या आणि आरोग्य विभागाचे काम पाहणारे कांदिवली विधानसभाचे भाजपाचे सचिव सुशील यादव यांना संपर्क केला. त्यानंतर सुशील यादव यांनी तातडीने पायाचे रुग्ण श्री विजय कडू यांच्यावर मुंबई येथे जसलोक रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया पार पाडली.
लाखो रुपयांचा शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी करून दिल्याबद्दल जामसंडे येथील कडू कुटुंबीयांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे आणि मुंबई भाजपा कांदिवली विधानसभा सचिव सुशील यादव तसेच सौ.तन्वी शिंदे यांचे आभार व्यक्त केले.





