मडूरे स्थानक समोर आढळला एका परप्रांतीय युवकाचा मृतदेह ; मृतदेहाचे झाले दोन तुकडे  ओक्खा एक्सप्रेस खाली तो सापडला असावा व्यक्त केला अंदाज

24

मडूरे स्थानक समोर आढळला एका परप्रांतीय युवकाचा मृतदेह ; मृतदेहाचे झाले दोन तुकडे  ओक्खा एक्सप्रेस खाली तो सापडला असावा व्यक्त केला अंदाज

 

बांदा (प्रतिनिधी) २५ फेब्रुवारी २०२४

 

    कोकण रेल्वेच्या मडूरे स्थानक समोर एका परप्रांतीय युवकाचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या सत्रात जाणाऱ्या ओक्खा एक्सप्रेस खाली तो सापडला. सदर युवक २५ ते ३० वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. त्याच्या खिशात आनंद नगर (गुजरात) चे तिकीट वगळता अन्य ओळखीचा पुरावा मिळाला नाही.

      रेल्वेच्या धडकेत त्याच्या मृतदेहाचे कंबरे खालून थेट दोन तुकडे झाले. तो रेल्वेतून कोसळून वाऱ्याच्या वेगात खाली आला असावा असा अंदाज बांदा पोलिसांनी व्यक्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मडूरे पोलीस पाटील नितीन नाईक व हेड कॉन्स्टेबल नरेश कुडतरकर यांनी पंचनामा केला. रेल्वे पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. सदर युवकाने आत्महत्या केली की तो तोल जाऊन कोसळला असावा याबाबत पोलीस तपास करीत आहेत. बांदा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.