विजय फाऊंडेशनचे समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद

24

विजय फाऊंडेशनचे समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद

कणकवली (प्रतिनिधी)

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला – क्रीडा, क्षेत्रामध्ये नेहेमीच अग्रेसर असलेल्या विजय फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी आहेत

.गोर गरीब, अनाथांच्या पाठीशी नेहमीच पाठीशी असलेले विजय फाऊंडेशन मार्फत माघी गणेश जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांना सलग तीन ते चार दिवस अन्न धान्य तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

देवगड, कणकवली, सांगवे, हरकुळ बुद्रुक, ओसरगाव इत्यादी ठिकाणच्या गणेश मंडळांना विजय फांऊडेशन च्या वतीने साहित्य वितरित करण्यात आले. तसेच ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक या प्रशालेतील रात्रशाळेतील अभ्यासिकेला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रात्रीच्या भोजनाचा सर्व खर्च विजय फाऊंडेशन मार्फत करण्यात येत आहे. हा उपक्रम तसेच संपूर्ण खर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण भोगटे यांनी केला असून याबाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या या उपक्रमांचे कौतुक होत आहे.विजय फाऊंडेशनचे आभार प्रशाला तसेच सर्व गणेश मंडळ यांच्या कडून व्यक्त केले जात आहेत