बांदा गणेश नगर येथे माघी गणेश जयंती उत्सव

80

बांदा गणेश नगर येथे माघी गणेश जयंती उत्सव

बांदा (मंगल कामत)

वाफोली मार्गावर गणेश नगर बांदा येथिल श्री अष्टसिद्धी गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघ शुद्ध चतुर्थीला मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
पहाटे पाच वाजता काकडआरती ,अभिषेक व पुजा होऊन दर्शनास आरंभ होईल. सकाळी 9 वाजता श्री सत्यविनायक महापुजा,दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्म सोहळा होईल.दुपारी 1 ते 3 महाप्रसाद,सायंकाळी 7 वाजता भजन तसेच रात्रौ 9 वाजता अष्टविनायक पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा “हा खेळ संचिताचा” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.