बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने १९ रोजी बांदा येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने यावर्षी शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात नियोजन सभा संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित भव्य चित्ररथ स्पर्धा व लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
१९ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी स्मारक, गडगेवाडी येथे शिवजन्मोत्सव साजरा करून नंतर त्याच ठिकाणावरून भव्य शोभायात्रा व चित्ररथ निघणार आहेत. सदर शोभायात्रा व चित्ररथ संपूर्ण बांदा शहरात फिरून बांदेश्वर मंदिर येथे समारोप करण्यात येणार आहे. याठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा हा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे.
भव्य खुल्या चित्ररथ स्पर्धेतील विजेता प्रथम संघास रोख १११११, व्दितीय क्रमांक ७७७७ तुतीय कम्रांक ५५५५ रुपये देण्यात येणार आहे. चित्ररथ स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राकेश परब (मो. ९४२११८९६२१) व राकेश केसरकर (मो
. ९८२३५१९९४४), अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे. चित्ररथासाठी लागणारे सर्व साहित्य व वाहन त्या संघाने स्वतःच आणायचे आहे. सदर चित्ररथ छत्रपती शिवाजी स्मारक बांदा येथून थेट बांदेश्वर मंदिर पर्यंत जाणार आहेत. स्पर्धेचे सर्व अधिकार परिक्षक व आयोजकांना असणार आहेत. या स्पर्धेचे बक्षिस वितरण दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कार्यक्रमात होणार आहे.
शिवजयंती उत्सवासाठी ज्यांना गुगल पे वरून देणगी द्यायची असेल तर राकेश परब ९४२११८९६२१, बाबा काणेकर ९४०४७६१५५९
यांच्या नंबर वर पाठवावे व संबंधिताना फोन करुन सांगणे. तसेच रोख स्वरूपात देणगी देणा-यांनी मंदार कल्याणकर, निलेश उर्फ पापू कदम, साईप्रसाद काणेकर, बाळू सावंत यांच्या कडे द्यावी असे आवाहन करण्यात आले.
या सभेमध्ये बांदा सरपंच प्रियांका नाईक, जि.प.माजी सदस्या श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, माजी जि.प.सद-या अर्चना पांगम, बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी सरपंच दिपक सावंत, ग्रां.पं. सदस्य साईप्रसाद काणेकर, राजाराम धारगळकर, रत्नाकर आगलावे, माजी ग्रा.पं सदस्य मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, मराठा समाज माजी सचिव म. गो. सावंत, महेश सावंत, बाबा काणेकर, निलेश सावंत, प्रविण गाड, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, सामाजिक कार्यकर्ते पापु उर्फ निलेश कदम, फिरोज खान, हेमंत मोर्ये, राकेश परब, संतोष परब, पापु कदम, प्रविण गाड, गिरीश भोगले, मराठा समाज समन्वयक लक्ष्मी सावंत, माजी पं समिती सदस्या राखी कळगुंटकर, ममता सावंत, माधवी गाड, सौ. हरमलकर, शैलेश केसरकर, राकेश केसरकर, जयप्रकाश सावंत, मिलिंद सावंत, विक्री कदम, संजय नाईक, अमित भांगले, माजी मराठा समाज अध्यक्ष निलेश मोरजकर, भुषण सावंत, केदार कणबर्गी, संकेत वेंगुर्लेकर, अक्षय मयेकर, नारायण बांदेकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





