एकनाथ शिंदे व नारायण राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन…!

आंगणेवाडी : आज होत असलेल्या श्री देवी आई भराडी देवीच्या जत्रोत्सवसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या भराडी आईच्या दर्शन निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. असे असताना त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील आहेत. आंगणेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आई भराडी देवीचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपचे आम. नितेश राणे यांनी स्वागत केले. या दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खास. श्रीकांत शिंदे, माजी खास. नीलेश राणे, आम. कालिदास कोळमकर, रवी फाटक, ब्रिगेडियर सुधीर सावंत, भाजपचे प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनीष दळवी, अतुल काळसेकर, आदी उपस्थित होते.