६ फेब्रुवारीला डेगवेत श्री स्थापेश्वर जत्रोत्सव…!

बांदा : प्रतिवर्षाप्रमाणे डेगवे येथील ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्रींची  पुजाअर्चा आदी धार्मिक विधी होऊन सकाळी ८ वाजल्या पासून देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. सायंकाळी भजनसेवेचा कार्यक्रम होईल. तसेच रात्रौ. ११.३० वा. पालखी प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ होईल. त्यानंतर देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा पातिव्रत्य तेज हा नाट्यप्रयोग सादर होईल.

भाविकांनी तसेच नाट्यरसिकांनी,  उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवेच्या वतीने कऱण्यात आले आहे.