बिबट्याच्या तावडीतून असा सुटला कुत्रा…!

सावंतवाडी : मळेवाड येथे कुत्र्यावर हल्ला करू पाहणारा बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे. मळेवाड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा ठिकठिकाणी सुरू होती. यापूर्वी गुळदुवे, राणेवाडी परिसरात बिबट्या अनेक वेळा दृष्टीस पडला होता. काही कुत्र्यांना त्यांनी भक्षही गेले होते.

काल रात्री असाच एक बिबट्या भर रस्त्यावरून रात्री तीनच्या सुमारास मळेवाड जकातनाका येथील श्री महालक्ष्मी मार्बल दुकानाशेजारी एका कुत्र्याला आपले भक्ष करण्यासाठी पाठलागावर आला असता तो दुकानाच्या कॅमेरात कैद झाला.

बिबट्याला पाहून हल्ला करण्यापूर्वीच कुत्र्याने पळ काढला. अखेर बिबट्या पुढे मार्गस्थ झाला. सावंतवाडी मळेवाड या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदरच्या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.