तळवडे, तळेबाजार, पावणाई येथील विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

103

तळवडे, तळेबाजार, पावणाई येथील विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील तळवडे तळेबाजार व पावणाई येथील २५.१५ योजनेतून तळेबाजार निपाणी देवगड रोड ते नंदू मांजरेकर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.२५.१५ योजनेतून काजरघाडी बंदर ते प्रदीप लब्दे घर ते हरिहरेश्वर मंदिर रस्ता खडी करण डांबरीकरण करणे. तसेच आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.या विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला,

सोबत उपस्थित भाजप पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर अमोल तेली,नंदू देसाई,पंकज दुखंडे, स्थानिक सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.