यशस्वी जीवनात मोठ मोठी आवाहने पेलताना शरीर सक्षम असणे गरजेचे –विशाल खत्री
देवगड (स्वप्नील लोके)
श्री स.ह केळकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, देवगड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संस्कार शिबीरातील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विदयार्थी दशेत असतानाच जीवनविषक ध्येय निश्चीत करून दैनदिन शरीराला व्यायामाची सवय लावली पाहिजे असे परखड मत विशाल खत्री (भा.प्र.से.) तहसिलदार देवगड यांनी व्यक्त केले.
देवगड महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मिठमुंबरी- बागवाडी येथे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास असे घोषवाक्य ठेवून विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी विशाल खत्री (भा.प्र.से.) यांनी सहभागी विदयार्थ्यांशी संवाद साधत जीवन विषयक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना यशस्वी जीवनात मोठ मोठी आवाहने पेलताना शरीर सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी शरीराला दैनदिन व्यायामाची जोड देणे गरजेचे असल्याचे मत विशाल खत्री यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रदिप कदम यांनी विदयार्थ्यांना लोकशाहीत मतदानाचे महत्व या विषयावर व्याख्यान दिले. या प्रसंगी मिठमुंबरी गावचे सरपंच बाळकृष्ण गांवकर यांच्या हस्ते विशाल खत्री यांचा देवगड महाविदयालयाच्या वतीने गुलाबपूष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय तावडे,प्रा पी.एन. कांबळे,प्राध्यापिका अमृत सागर आधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा पी.एन. कांबळे तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. संजय तावडे यांनी मानले




