जितेंद्र तेली राम एडके यांची विजयदुर्ग आगार एसटी कामगार सेनेच्या कार्यकारणीपदी निवड
देवगड दि ८ जानेवारी (स्वप्नील लोके)
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेच्या विजयदुर्ग आगार अध्यक्षपदी जितेंद्र तेली व सचिवपदी राम एडके यांची निवड करण्यात आली. विजयदुर्ग आगाराची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची उर्वरित कार्यकारणी देखील यावेळी निवडण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष निखिल निकम, उपाध्यक्ष रवी राणे ,उपाध्यक्ष ए आय भाटकर, सहसचिव पी बी आयवाळे ,सहसचिव बी डी शिरसाट , तर सदस्यपदी पी इ घाडी, आर व्ही दळवी, एस जी नागरगोजे, तर प्रसिद्धीप्रमुख ए बी. जाधव अशी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. यावेळी सर्व कार्यकारणीचे विभागीय अध्यक्ष अनुप नाईक, विभागीय सचिव भगवान धुरी, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्यात.





