रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने संजय धुरी यांना श्रद्धांजली
देवगड (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने इंद्रप्रस्थ हॉल येथे चार्टर्ड सेक्रेटरी कै. संजय धुरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडचे चार्टर्ड सेक्रेटरी संजय धुरी यांचे दिनांक 1 जानेवारी रोजी हृदयविकाराने आकस्मिन निधन झाले होते. याप्रसंगी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील कोल्हापूर ,कुडाळ येथील असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे,असिस्टंट गव्हर्नर गजानन कांदळगावकर, शशिकांत चव्हाण, तसेच रोटरी प्रेसिडेंट प्रवीण पोकळे ,चार्टर्ड प्रेसिडेंट हनिफ मेमन,मनस्वी घारे, यांनी अनेक तसेच रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.





