मुंबई गोवा महामार्गावरील हुबंरठ पुलावर व्हॅगनार गाडीला अपघात , एक ठार ; तीन जखमी
कणकवली प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील हुबंरठ पुलाजवळ झालेल्या अपघातात व्हॅगनार चालक ठार झाला आहे सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला गोवा येथून मुंबईच्या दिशेने कारमधून एक कुटुंब व्हॅगनार कार क्रमांक MH 03 DJ 7890 या कारने घाटकोपर येथील शेट्टी कुटुंब प्रवास करत होते . कार हुबंरठ पुलाजवळ आली असताना
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाजवळ जाऊन आदळली. सदर व्हॅगनर कारमध्ये एक महिला छोटी मुलगी दोन पुरुष समावेश होता कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव कॉन्स्टेबल किरण मेठे, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, होमगार्ड आशिष जाधव, दत्ता कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान या कारमधील सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातात व्हॅगनार गाडीचा चालक ठार झाला असून गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे





