संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपदी संतोष किंजवडेकर

131

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपदी संतोष किंजवडेकर

देवगड (स्वप्नील लोके)

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशी नुसार जिल्हाधिकारी यांनी देवगड तालुका संजय गांधी निराधार समितीची निवड केली. असून या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हाचिटणीस संतोष मनोहर किंजवडेकर यांची निवड केली आहे .

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्याशी शिफारशीनुसार देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी निवड केलेल्या समितीची यादी जाहीर केली असून या समितीचे अध्यक्षपदी संतोष किंजवडेकर तर सदस्यपदी अमित साळुंखे (मागासवर्गीय अप्रशासकीय प्रतिनिधी), सौ संजना आळवे (महिला अशासकीय प्रतिनिधी) संतोष जंगले व प्रकाश जंगले (इतर मागासवर्गीय वि.भा.ज. प्रवर्गातील दोन अशासकीय प्रतिनिधी) सुहास मनोहर राणे (सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी) भालचंद्र मांजरेकर (अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी) वैभव करंगुटकर (संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय प्रतिनिधी) शैलेश लोके (संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती, अशासकीय प्रतिनिधी) रमेश सावंत (संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व अशासकीय प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली आहे

या समितीचे सदस्य शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवगड, मुख्याधिकारी नगरपंचायत देवगड व तहसीलदार आणि नायब तहसीलदार राहणार आहेत.