१२ जानेवारीला जिमखाना सावंतवाडी येथे सिंधूरत्न जाॅब फेअर २०२४ चे आयोजन

82

१२ जानेवारीला जिमखाना सावंतवाडी येथे सिंधूरत्न जाॅब फेअर २०२४ चे आयोजन

सावंतवाडी (हेमंत मराठे)

कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी १२ जानेवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर सकाळी ९ ते ५ या वेळेत सिंधूरत्न जाॅब फेअर २०२४ चे आयोजन केले आहे याबाबतची माहीती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ओरस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या जॉब फेअर मध्ये महाराष्ट्रातील तब्बल 50 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत जॉब फेअर मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देणार असल्याचे यावेळी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी स्पष्ट केले.