सिंधुदुर्ग जिल्हा संघाची सॉफ्ट टेनिस निवड चाचणी उद्या.!

36

सिंधुदुर्ग : सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या वतीने सीनियर पुरुष व महिला यांच्या सॉफ्ट टेनिस स्पर्धा दिनांक 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा, संकुल प्रतापनगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचा संघ निवड चाचणी रविवार दिनांक 10/ 12 /2023 रोजी सकाळी 10.30 वाजता वराडकर हायस्कूल,   कट्टा ता. मालवण येथे होणार आहे. सॉफ्ट टेनिस हा खेळ शालेय स्तरावर 14,17 19 या गटांमध्ये खेळला जातो. महाराष्ट्र ऑलिम्पिक व इंडियन ऑलम्पिक असोसिएशनची मान्यता आहे.
तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सचिव संजय पेंडुरकर यांनी केले आहे.