बांदा : बांदा नट वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आडाळी येथील विष्णू नारायण गावकर यांनी विजयालक्ष्मी विष्णू गावकर व बिपीन विष्णू गावकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. परीक्षक म्हणून गुरुनाथ नार्वेकर, चंद्रकांत सावंत यांनी काम पाहिले.

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात अस्मि प्रवीण मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) हिने तर लहान गटात माही देविदास सरमळकर (जिल्हा परिषद शाळा, सरमळे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तिसरी ते चौथी गटासाठी ‘संस्कारकथा’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात दुर्वा मनोज राऊळ (जिल्हा परिषद शाळा, माडखोल), तनिष्का संदीप देसाई (जिल्हा परिषद शाळा, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. मेघराज महेश गवस (दिव्य ज्योती हायस्कुल, बांदा) व सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘आपल्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ हा विषय देण्यात आला होता. या गटात नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा), रेहन अमित खानोलकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. श्रावणी किशोर गवस (जिल्हा परिषद शाळा, वाफोली) व शमिका अमोघ सिद्ध्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन व (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गावकर व (कै.) बिपीन विष्णू गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, विशाखा गावकर, संचालक प्रकाश पाणदरे, सौ. स्वप्नीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रवीण मांजरेकर, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, शैलेश गवस, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू यांच्यासह पालक, शिक्षक उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले..
अस्मी हिला यापूर्वीही अनेक स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘माझा अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर तिने भाषण केले. अस्मीला तीची आई प्रा. सुषमा मांजरेकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अस्मीचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक पी. एम. सावंत , पर्यवेक्षिका बी. आर. चौकेकर व यांनी अभिनंदन केले.





