नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज12 खासदारांनी राजीनामे सादर केले आहेत. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तर तेलंगणात आठ जागा जिंकल्या आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना तिकीट दिले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदारांनी निवडणूक लढवली. त्याचवेळी छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातील तीन खासदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आले होते.
Home ब्रेकिंग न्यूज भाजपाच्या १० खासदारांचा राजीनामा, ३ केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश.! ‘हे’ आहे कारण.





