तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूलचे सुयश.! ; प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धेत मारली बाजी.

55

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूल येथे पार पडलेल्या 51व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये ६ वी ते ८ वी या गटात कु. कृष्णा महेश पास्ते व विराज नंदकिशोर राऊळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ९वी ते 1२वी गटात
रुद्रांगी रवींद्र सावंत व मानसी सुदेश राणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी या गटामध्ये कु. भार्गवी शेटवे या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.