कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस प्रशालेचे उत्तुंग यश.! ; दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड.

23

सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. अमुल्य घाडी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. राम फाले या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे.
या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.