कणकवली : कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर बहुतांश गाड्या विजेवर धावत आहेत. यामध्ये आणखी दोन गाड्यांची भर पडली असून यात कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असणाऱ्या दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसचाही समावेश आहे. सावंतवाडी-मडगाव-सावंतवाडी पॅसेंजरही आता विजेवर धावणार आहे. दिवा-सावंतवाडी (१०१०५) २ डिसेंबरपासून, सावंतवाडी-दिवा (१०१०६) ३ डिसेंबरपासून, सावंतवाडी-मडगाव (५०१०७) २ डिसेंबरपासून, मडगाव-सावंतवाडी (५०१०८) ३ डिसेंबरपासून विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.





