कुडाळ शहराचे ग्रामदैवत कुडाळेश्वरचा जत्रोत्सव आज.!

54

कुडाळ : कुडाळ शहराचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान श्री देव कुडाळेश्वर मंदिरचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार, २ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर देवाला नारळ, केळी ठेवणे, नवस करणे, नवस फेडणे हे धार्मिक कार्यक्रम सुरू राहतील. रात्री ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात श्रींची पालखी प्रदक्षिणा होईल. त्यानंतर १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होईल. पहाटे ‘दहिकाला’ होऊन वार्षिक जत्रोत्सवाची सांगता होईल. उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.